कोरोनासारख्या भयंकर संकटसमयी देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी थेट आपल्या पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील नर्स छायाताई यांना फोन करुन माहिती घेतात, आदबीनं विचारपूस करतात आणि सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करतात, हे प्रत्यक्ष कोरोनाविरुद्ध मैदानात उतरुन लढणाऱ्यांना प्रचंड उत्साह वाढवणारे आहे.
देशाचा व्याप आणि त्यात दारात उभे ठाकलेले महासंकट, अशा परिस्थितीतही इतका मनमोकळा आणि निखळ संवाद मा. मोदींजींच्या संवेदनशीलतेची साक्ष देणारा आहे. खरं तर नर्स म्हणजे आरोग्यसेवेतील तळाला पण महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक. या घटकाशी थेट देशाच्या सर्वोच्च व्यक्तीने संवाद साधून काम करण्यासाठी प्रोत्साहनपर संवाद देशवासियांनाही आत्मविश्वास देणारा आहे. लढण्याची, संघर्ष करण्याची आणि संकटे परतवून लावण्याची प्रेरणा देणारे नेतृत्व मा. मोदीजी अद्वितीय ठरतात.