एक जण म्हटला-आपण मंदिराला देणगी न देता हॉस्पिटल्स उभारावी आणि पुढच्या पिढीला हेच सांगावे.
त्याला उत्तर:-
इटली मध्ये दुसऱ्या नंबरची आरोग्य सेवा आहे असं म्हणतात
अमेरिकेत पैसा/ हॉस्पिटलची काय कमी आहे ?
तेथील साथ जी भारता बरोबरच सुरु झाली ( 30 जानेवारी च्या आसपास) तरी तेथे प्रचंड संक्रमण का झाले मग ? आणि आपल्याकडे का कंट्रोल मध्ये आहे ?
हॉस्पिटल / शाळा हव्यातच पण...पण, धर्म आणि संस्कृतिचा बळी देऊन कदापि नाही 🙏
पुढच्या पिढीला भारतीय संस्कृति, सनातन धर्म हात जोडून सांगा
आम्ही वेडे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करुन स्वतःच्या देशाला, धर्म-संस्कृतिला नावे ठेवणारे 😢
👉🏻 हात जोडून अभिवादन करणे आज जगाने स्विकारले आहे
👉🏻 आपल्याकडे १४ दिवसाचे सूतक हे quarantine सारखेच !
👉🏻 बाळ-बाळांतीणीला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून १० दिवसाची वृध्दी पाळणे !
👉🏻 जुन्या काळात स्त्रीयांना आराम नसायचा, तो मिळावाच म्हणून ४ दिवसाचे रजोधर्म पालन, self quarentine !
👉🏻 साप शेतकऱ्याचा मित्र उंदीर खाणारा, म्हणून सापाची पुजा नागपंचमीला ! # कृतज्ञता
👉🏻 जे दिवे वर्षभर प्रकाश देतात त्यांची एका दिवशी पुजा "दिप धुती अमावस्या ! # कृतज्ञता
👉🏻 नद्या ह्या सर्व सजीवांसाठी आवश्यक, त्या दूषित होऊ नयेत म्हणून नद्यानां मातेची पदवी, पावित्र्य जपावे म्हणून ! लग्नाच्या मंगळाष्टकात त्यांचा आवर्जुन उल्लेख आयुष्यभर लक्षात राहावा म्हणून-गंगा सिंधु गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया ! # कृतज्ञता
👉🏻 वटपोर्णिमा / तुळस- झाडांचं महात्म्य समजावे म्हणून वट पुजा, त्यातुन पडणारे पाणी मातीला सुपिक करते, वड़ाखालची माती शेतकऱ्याला खतासारखी, तुलसी पुजन ! # कृतज्ञता
👉🏻 गोमाता- आईचे दूध दोन वर्ष पितो, पण गाईचे आयुष्यभर, म्हणून तीला मातेचा दर्जा ! तिचे शेण/गोमूत्र कृषिप्रधान भारतात बहुमोल खत शिवाय ती शेतात कष्ट करणारे बैल देणारी, म्हणून दिवाळीची सुरुवात गाय-वासराच्या पुजनाने-वसुबारस # कृतज्ञता
👉🏻पोळा- बैल आमच्या बापासारखा आमच्यासाठी शेतात राबतो, कृषिप्रधान भारताचा कणा, म्हणून पोळ्याला त्याचे पूजन # कृतज्ञता
👉🏻होळी/ धुलिवंदन- जीवनातल्या टाकाऊ गोष्टी सोडा-जाळा हे सुचवणारा सण, वसंताच्या आगमनाला सृष्टीला नवचैतन्य येते, नवी पालवी फुटते, निसर्ग रंगाची उधळण करतो, म्हणून धुलिवंदनाचा सण सर्व भेद नष्ट करुन रंगात रंगवणारा # कृतज्ञता
👉🏻 चांद्र मास पण सौर वर्ष- आपले महिने चंद्रगतीवर आधारीत २८/२९ दिवसाचे, म्हणून वर्षाचे दिवस कमी कमी होतात, या कारणाने परत गणना मूळ पदावर यावी म्हणून दर तीन वर्षानी धोंड्याचा महिना-पुरुषोत्तम मास, किती वैज्ञानिक !!!
खूप कांही सांगण्यासारखे आहे, काय म्हणून सांगावे ? विज्ञाच्या कसोटीवर घासता येणारा हा सनातन धर्म आहे, ऋषि-मुनींनी निर्माण केलेली संस्कृति आहे ही !
आज कोरोनाच्या साथीत सर्व जग आपल्या प्रथा पाळत आहे # प्रेत-दहन !
म्हणून पुढच्या पिढीला हे शिकवा-डोळस पणाने संस्कृतिकडे पाहा, अभिमान बाळगा भारतीय असल्याचा आ णि आपल्या देव-देश-धर्माचा !!!